मराठी चित्रपटांमध्ये वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न अनेक निर्माते करतात ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना चांगले आणि दर्जेदार चित्रपट पाहण्याची संच्च्ी मिळते. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा विषय सगळीकडे चर्चिला जात आहे. याच विषयावर मराठीत प्रथमच करुया उद्याची बात चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. अभिनेत्री निर्मात्री अर्चना नेवरेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सध्या सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल चर्चा सुरु आहे. परंतु ते नक्की काय आहे? या समस्येवर उपाय काय आहे याबाबत जास्त चर्चा केली जात नाही. याच विषयावर मी या चित्रपटाची मांडणी केली आहे. क्षितीज झारापकरने जेव्हा मला ही कथा ऐकवली तेव्हा मला ती खूपच आवडली. या चित्रपटाची केवळ कथाच क्षितीजची आहे असे नाही तर त्याने दिग्दर्शन, पटकथा आणि संवादाची जबाबदाराही पार पाडली आहे. अमेरिकेच्या यूएसएबीएफ मध्ये आमचा हा चित्रपट दाखवण्यात आला. आमच्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ग्रीन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. चित्रपटामध्ये पंकज विष्णू, नेहा पेंडसे यांच्या मुख्य भूमिका असून त्यांच्यासोबत अस्ताद काळे, सुच्च्ीर दळवी, स्मिता तळवलकर. विजय चव्हाण, संजय मोने, सुप्रिया पाठारे, जयवंत वाडकर असे दिग्गज कलाकार असून मोहन जोशी यांनी छोटी परंतु महत्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला साजेसे संगीत भगवंत नार्वेकर यांनी दिले असून गीते सुरेश वाडकर, रघुनंदन पणशीकर यांनी गायलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार आहोत.
No comments:
Post a Comment